गुरुवार, 26 मई 2016

Modern Technical Institute





प्रिय,
विद्यार्थी / पालक,
मॉडर्न टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये आपले सस्नेह स्वागत. !!!

उदगीर मध्ये मागील ९ वर्षापासून आमच्या मॉडर्न टेक्निकल इन्स्टिट्यूट ने तंत्र शिक्षणाचे कार्य सुरु केले आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना तंत्र शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी जीवनाची सुरुवात  करून देण्याचे ध्येय संस्थेने अंगिकारले आहे.

            विद्यार्थी मित्रहो, भारताची औद्योगिक प्रगती दैदिप्यमान गतीने होत असून खूप मोठया प्रमाणात या क्षेत्रात रोजगार व स्वयं रोजगाराच्या संधी प्रतिदिन निर्माण होत आहेत. इंजिनीयरिंगक्षेत्रामध्ये, प्रामुख्याने पायाभूत क्षेत्रे उदा.इलेक्ट्रिक,इलेक्ट्रॉनिक, अॅटोमोबाईल्स, मेकॅनिकल, व कम्प्युटर इंडस्ट्रीजमधे अभियंता, सहा. अभियंते, टेकनोक्रॅटस, कुशल कारागीर यांची प्रचंड आवश्यकता असून या क्षेत्रातील व्यवसाय वाढीच्या प्रमाणात आवश्यकता असलेल्या कुशल मनुष्य बळाची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. नेहमीच्या पारंपारिक पदवी प्रशिक्षणाच्या मागे लागून बेकारांच्या रांगेत उभे राहण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण पूर्ण करून औद्यागिक आस्थापना मध्ये त्वरित चांगली संधी मिळवणे अथवा या क्षेत्रामध्ये स्वतःचा लघुउद्योग स्थापन करणे ही  आजच्या काळाची मागणी व गरज  आहे.
            आमच्या संस्थेमध्ये वरील विविध शाखांमध्ये शासनमान्य फिटर, मोटर मेकॅनिक ,डिझेल मेकॅनिक,इलेक्ट्रीशियन, वायरमन, सिव्हिल ,डिप्लोमा इन सर्वेर,  बांधकाम पर्यवेक्षक,
 हा तांत्रिक अभ्यासक्रम मागील ९ वर्षापासून सुरु केलेला आहे. प्रत्येक विद्यार्थी हा स्वयंपूर्ण होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थी व्यवसाय शिक्षण प्रमाणपत्र  घेऊन उत्तीर्ण होऊन संपूर्ण भारतात व प्रदेशात  सौदी अरब, मस्कत, कतार, दुबई सर्वत्र निमशासकीय नोकऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरी करत आहे.इथून पुढे आमच्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी व्यवसाय शिक्षण मोठ्या उत्साहाने  घेऊन या  तंत्राशिक्षांची मनापासून कस धरून आपल्या जीवनातील यशस्वी वाटचाल करावी तसेच आपल्या जीवनातील प्रगतीच्या शिखरावर पोहचावे अशी आमच्या संस्थेची व आमच्या शिक्षकांची इच्छा आहे. आपण आयुष्यातील अतिउच्च शिखर गाठावे अशी अशा बाळगून विद्यार्थी व पालकांना आमच्याकडून आपणांस हार्दिक शुभेच्छा.
 धन्यवाद!!!
                                                                              आपले स्नेहांकित,

                                           मॉडर्न टेक्निकल इन्स्टिट्यूट

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें