मंगलवार, 4 अक्टूबर 2016

construction supervisor


मॉडर्न टेक्नीकल इन्स्टिट्यूट,उदगीर मॉडर्न टेक्निकल इन्स्टिट्यूट
प्रिय,
विद्यार्थी / पालक,
मॉडर्न टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये आपले सस्नेह स्वागत. !!!
          उदगीर मध्ये मागील ९ वर्षापासून आमच्या मॉडर्न टेक्निकल इन्स्टिट्यूट ने तंत्र शिक्षणाचे कार्य सुरु केले आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना तंत्र शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी जीवनाची सुरुवात  करून देण्याचे ध्येय संस्थेने अंगिकारले आहे.
            विद्यार्थी मित्रहो, भारताची औद्योगिक प्रगती दैदिप्यमान गतीने होत असून खूप मोठया प्रमाणात या क्षेत्रात रोजगार व स्वयं रोजगाराच्या संधी प्रतिदिन निर्माण होत आहेत. इंजिनीयरिंगक्षेत्रामध्ये, प्रामुख्याने पायाभूत क्षेत्रे उदा.इलेक्ट्रिक,इलेक्ट्रॉनिक, अॅटोमोबाईल्स, मेकॅनिकल, व कम्प्युटर इंडस्ट्रीजमधे अभियंता, सहा. अभियंते, टेकनोक्रॅटस, कुशल कारागीर यांची प्रचंड आवश्यकता असून या क्षेत्रातील व्यवसाय वाढीच्या प्रमाणात आवश्यकता असलेल्या कुशल मनुष्य बळाची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. नेहमीच्या पारंपारिक पदवी प्रशिक्षणाच्या मागे लागून बेकारांच्या रांगेत उभे राहण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण पूर्ण करून औद्यागिक आस्थापना मध्ये त्वरित चांगली संधी मिळवणे अथवा या क्षेत्रामध्ये स्वतःचा लघुउद्योग स्थापन करणे ही  आजच्या काळाची मागणी व गरज  आहे.
            आमच्या संस्थेमध्ये वरील विविध शाखांमध्ये शासनमान्य फिटर, मोटर मेकॅनिक ,डिझेल मेकॅनिक,इलेक्ट्रीशियन, वायरमन, सिव्हिल , बांधकाम पर्यवेक्षक, डिप्लोमा इन लँड सरवेर ,
 हा तांत्रिक अभ्यासक्रम मागील ९ वर्षापासून सुरु केलेला आहे. प्रत्येक विद्यार्थी हा स्वयंपूर्ण होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थी व्यवसाय शिक्षण प्रमाणपत्र  घेऊन उत्तीर्ण होऊन संपूर्ण भारतात व प्रदेशात  सौदी अरब, मस्कत, कतार, दुबई सर्वत्र निमशासकीय नोकऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरी करत आहे.इथून पुढे आमच्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी व्यवसाय शिक्षण मोठ्या उत्साहाने  घेऊन या  तंत्राशिक्षांची मनापासून कस धरून आपल्या जीवनातील यशस्वी वाटचाल करावी तसेच आपल्या जीवनातील प्रगतीच्या शिखरावर पोहचावे अशी आमच्या संस्थेची व आमच्या शिक्षकांची इच्छा आहे. आपण आयुष्यातील अतिउच्च शिखर गाठावे अशी अशा बाळगून विद्यार्थी व पालकांना आमच्याकडून आपणांस हार्दिक शुभेच्छा.
 धन्यवाद!!!
                                                                                                                        आपले स्नेहांकित,
                                                                                                     मॉडर्न टेक्निकल इन्स्टिट्यूट

मॉडर्न टेक्निकल इन्स्टिट्यूट
बांधकाम पर्यवेक्षक या अभ्यासक्रमा संबंधी नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न
) बांधकाम पर्यवेक्षक या अभ्यासक्रमाची फी काय आहे?
-
ह्याचा तपशील माहिती पुस्तिकेत बघावा.
) या अभ्यासक्रमात कोण प्रवेश घेऊ शकतो?
- अभ्यासक्रमात १० वी पास१२ वी पास / ते पदवीधर कोणत्याही शाखेचा. सिव्हील इंजिनिरिंग पदविका आणि पदवी मध्ये एखादे वर्ष नापास असेल तरी प्रवेश घेता येईल आणि पुढील कोणतेही शिक्षण झालेला, मुलगा किंवा मुलगी प्रवेश घेऊ शकते
) बांधकाम पर्यवेक्षक या अभ्यासक्रमाला शासन मान्यता आहे काय? कोणाची?
- होय, महारष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई यांची मान्यता आहे.
) बांधकाम पर्यवेक्षक या अभ्यासक्रमा नंतर शासकीय नोकरी मिळते काय?
-बांधकाम पर्यवेक्षक कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपणांस सार्वजनिक बांधकाम खाते, जलसंपदा विभाग, वनविभाग, जिल्हा परिषद, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना,पंचायत समिती, एम.आय.डी.सी., महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र गृहनिर्माण प्राधिकरण (MHADA) नगरपालिका ,  महानगरपालिका ,इ. ठिकाणी शासकीय विभागात सिविल इंजि.असिस्टंट या पदावर नोकरी करण्याची संधी मिळू शकते व पदोन्नतीने जे.इ.(J.E.) व त्यावरील पदापर्यंत आपण मजल  मारू  शकता.
) या कोर्स ला शासनच GR किंवा इतर आधार आहे काय?
- होय, शासन निर्णय क्रमांक १००७/प्र.क्र. ३२/आस्था/दि. ११//२००८ अन्वये सार्वजनिक बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पाठयक्रमाशी मंडळातील construction supervisor हा अभ्यासक्रम समकक्ष आहे
-
तसेच शासन निर्णय एपीटी-२३९६/२१५/सीआर ३५०/ दि. २६/११/१९९७ अन्वये जिल्हा परिषदे मधील कनिष्ट अभियंत्रिकी सहाय्यक या पदावर नाम निर्देशनाने अथवा बदली ने करण्यासाठी मंडळाचा बांधकाम पर्यवेक्षक हा अभ्यासक्रम समकक्ष आहे.
१ वर्ष व २ वर्ष कालावधीच्या पूर्ण वेळ स्वरूपाच्या विविध गटातील अभ्यासक्रमांना Gov.ITI च्या अभ्यासक्रमांशी नोकरीसांठी पर्यायी शैक्षणिक अर्हता (Alternate Qualification) म्हणून या शासन निर्णयान्व्ये मान्यता देण्यात आली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक : व्हिओसी-२०१२/३३७/प्र.क्र.१६१/व्यशि-४,दिनांक १६ जुलै,२०१२.
) हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर registration मिळते काय?
- होय, यासाठी PWD किंवा ZP मध्ये registration करता येईल.
) या अभ्यासक्रमास मुली प्रवेश घेऊ शकतात का?
- होय मुली व महीला या कोर्स ला प्रवेश घेऊ शकतात व शसकीय नोकरी मुलीसाठी रिक्त जागा उपलब्ध असतात.
) मि शाळा सोडून खूप वर्षे झालीत, मला समजेल का?
- होय, यासाठी आपणास नियमित हजर राहावे लागेल अभ्यास करावा लागेल
०९ हा अभ्यासक्रम कोण कोणत्या भाषेतून शिकता येतो?

- होय, मराठी,इंग्रजी भाषेतून शिकता येतो.
१०) ह्या अभ्यासक्रमाची पुस्तके/नोटस मिळतात का?
-
होय, यासाठी आपणास पुस्तकाची किमत भरून संस्थेतून पुस्तके मिळतात.
११) आपल्याकडे प्रवेश घेतल्यास शिष्यवृत्ती मिळते काय?
- सध्या याला शासनाची कोणतीही शिष्यवृत्ती देय नाही
१२) घरून जाने येणे करण्यासाठी बस पास मिळतो का ?
-
होय, यासाठी संस्थेची पूर्ण फी भरावी लागेल. म्हणजे कागदपत्र देण्यात येतील पास मिळेल
१३) स्पर्धा परीक्षेचे मार्ग दर्शन केल्या जाते काय?
- होय, यासाठी आम्ही स्वतंत्र Test Series घेतो याची फी वेळोवेळी ठरवण्यात येते.
१४) स्पर्धा परीक्षेचे पेपर कोणत्या माध्यमात येतात.
- स्पर्धा परीक्षेचे पेपर मराठी आणि इंग्रजी या माध्यमातून येतात. पण कोणत्या वेळी कोणते माध्यम वापरले जाईल हे आम्ही निश्चित सांगू शकत नाही. हे आमच्या अधिकारात येत नाही.
१५) नोकरीच्या जाहिराती केंव्हा केंव्हा येतात?
   - हे आम्ही सांगू शकत नाही.
१६) हा अभ्यासक्रम केल्यावर रोजगार मिळतो काय? असल्यास कोठे?
- खाजगी बांधकाम क्षेत्रात विविध कंपन्यांमध्ये, सिव्हील इंजीनीअर, आर्किटेक्ट, बिल्डर कडे नोकरी उपलब्ध असते.
१७) आपण नोकरी लावून देण्यास मदत करता काय?
-
होय, आम्ही याबाबत नेहमी मार्गदर्शन करतो.
१८) नोकरीत किती रुपयाचे मासिक वेतन मिळते?
- मासिक वेतन हे आपल्या कुवतीवर, काम करण्याच्या क्षमतेवर आणि आपण कोणत्या शहरात कामास इच्छुक आहात यावर अवलंबून आसते. (५००० ते १५०००) पर्यंत मिळू शकेल.
१९) आपल्या येथील वर्गाचा वेळ कोणता असतो.
- आमच्या संथेत वर्ग 10:00AM ते 2:00PM या वेळेमध्ये असते.
) बांधकाम पर्यवेक्षक या अभ्यासक्रमास किती विषय आहेत?
- या अभ्यासक्रमास विषय असतात प्रात्यक्षिक असतात.
) परीक्षा साधारण कोणत्या महिन्यात होते?
- परीक्षा एप्रिल महिन्यात होते.
२४) परीक्षेचे सेंटर कुठे असते?
- Government Technical High School, देगलूर रोड, Government ITI , उदगीर येथे असते.रोड, येथे असते.
२५) बोर्डाच्या परीक्षेचे प्रात्यक्षिक कोठे होते?   मॉडर्न टेक्निकल इन्स्टिट्यूट उदगीर येथे.
कॉन्ट्रक्टर म्हणून सार्वजनिक विभागातील कामे करण्यासाठी (३०) तीस लाखांचे तसेच जिल्हा परिषदेचे कामे करण्यासाठी (७) सात लाखांचे रजिस्ट्रेशन करता येते
Survey Lab      
या प्रयोग शाळेमध्ये, मोजणी शास्त्राच्या अभ्यास क्रमानुसार लागणारे सर्व उपकरणे, उदा. डंपी लेव्हल, थीओडोलाईट, प्लेन टेबल, क्रॉस स्टाफ, प्रीझमॅटीक कंपास, रेंजिंग रॉड, साखळी, पेग, लेवलिंग स्टाफ, टेप, खुंटी . उपलब्ध आहेत. या सर्व उपकरणांचे संच संस्थे मध्ये उपलब्ध असून त्याचे प्रात्यक्षिक नियमित घेतले जाते.
                                                    प्रवेश फी संबंधी नियम व अटी : विद्यार्थ्यांसाठी नियम व अटी :
१. वर्गातील साधन सामुग्रीची काळजी घेणे हि प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे. कोणत्याही प्रकारे साधन सामुग्रीची नुकसान करणाऱ्या विद्यार्थ्यांना दंड केला जाईल.
२. संस्थेच्या आवारात विद्यार्थ्याने शिक्षकइतर कर्मचारी तसेच इतर विद्यार्थी यांच्याशी गैरवर्तन केल्यास त्यांना संस्थेतून कमी करण्यात येईल.
३. प्रवेश घेतेवळी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे ओळखपत्र वर्षभर जवळ ठेवणे बंधनकारक आहे.
४. अंतिम प्रवेश घेतल्यावर कुठल्याही सबबीवर प्रवेश रद्द करता येणार नाही.
५. प्राचार्य यांचेकडे कोणतीही तक्रार करावयाची असल्यास ती आपल्या वर्गप्रमुखामार्फतच करावी.
६. वेळोवेळी कार्यालयाकडून अथवा वर्गप्रमुखाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे सर्वाना गरजेचे आहे.
७. विद्यार्थ्यांनी वेळेत वर्गात आले पाहिजे व वर्गशिक्षाकांच्या लेखी पूर्व परवानगी शिवाय वर्ग सोडून जाऊ नये.
टिप:  एकदा भरलेली फीस कोणत्याही कारणास्तव पुन्हा परत अथवा दुसर्याच्या नवे केली जाणार नाही.  वरील नियम व अटी विद्यार्थीपालक व संस्थेच्या हिताच्या आहेत कृपया याची नोंद घ्यावी.
SR NO
PAPER CODE
SUBJECT NAME
TH/PR
HOURS
MAX MARKS
MIN MARKS
1
30420211
Consuctiotrn Material and Practices
TH-I
3
100
35
2
30420212
Estimating And costing
TH-II
3
100
35
3
30420213
Surveying and leveling
TH-III
3
100
35
4
30420221
Construction practices
PR-I
6
200
100
5
30420222
Surveying and leveling
PR-II
3
100
50




Total
600
255
 नोट- प्रवेशा साठी लागणारे कगद पत्र १० वी किवां १२ वी चे मार्क मेमो चे दोन प्रती झेरॉक्स  ओरिजिनल टी.सी& मार्क मेमो किंवा सनद, पाच फोटो.    
        फोन नंबर-02385-256786 मो.9923047286,8983521209,9405056416